ब्लू स्क्रीन ऑफ डेथ- क्राउडस्ट्राइकमुळे सर्वात मोठा सायबर क्रॅश

Microsoft CrowdStrike outage Biggest IT Crash
Microsoft CrowdStrike outage Biggest IT Crash - 

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेत तांत्रिक समस्या निर्माण झाली. भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला आणि जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर प्रोव्हाईड करणारी कंपनी मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बिघडले. त्यामुळे भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. जगभरातील संगणक अन् लॅपटॉपवर असणार्‍या विंडोज सिस्टमवर ब्लू स्क्रीन आली. भारतासह सर्वच देशांवर याचा परिणाम झाला. अँटीव्हायरस प्रोग्रामच्या अपडेटमुळे अलिकडच्या वर्षांतील सर्वात मोठा असा हा सायबर क्रॅश समजला जात आहे.

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन - मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवांना अँटीव्हायरस 'क्राउडस्ट्राइक'च्या अपडेटमुळे समस्या

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या ऍझ्युअर(एझेडयुआरई) बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला क्राऊडस्ट्राईक ने आपल्या फाल्कन प्रोडक्टसाठी एक अपडेट जारी केलं होतं. त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या ऍझ्युअर क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट ३६५ हे उत्पादकता सॉफ्टवेअर आहे, ज्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आउटलुक आणि वन नोट (Word, Excel, PowerPoint, Outlook and One Note ) सारख्या लोकप्रिय अनुप्रयोगांचा समावेश आहे. ज्यामुळे स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. त्याचा परिणाम कनेक्टिव्हिटी फेलियरमध्ये झाला. मायक्रोसॉफ्टने या तांत्रिक समस्येतून बाहेर येण्यासाठी काही स्टेप दिल्या आहेत. त्याचा वापर करुन ही समस्या दूर करता येणार आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे की, आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीम कार्यरत आहेत.

मायक्रोसॉफ्ट आउटेज- बुकिंग, चेक-इन, स्टॉक मार्केट आणि इतर ऑनलाइन सेवा प्रभावित

खरेतर ही समस्या गुरुवारी १९००जीएमटी वाजता सुरू झाली, ज्यामुळे सायबरसुरक्षा सॉफ्टवेअर क्राउडस्ट्राइक फाल्कन चालवणार्‍या ऍझ्युअर क्लाउड प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांवर परिणाम झाला. नंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी दुपारी १२ वाजता जगभरात अनेक ठिकाणी अचानक सर्व्हर डाऊन झाले. संगणकाची स्क्रिन अचानक निळी झाली. दिल्ली, मुंबई, बेंगलूरू या ठिकाणी असलेल्या कंपन्यात काम सुरू असताना अचानक लॅपटॉप- कंम्प्यूटरवर निळी स्किन ( Blue screen) आली. सर्व काही बंद झालं. रिस्टार्ट केल्यानंतरही काही होत नव्हतं. त्यावर एक मेसेजही दिसत होता. विंडोजची ऑपरेटिंग सिस्टिम बंद झाल्यामुळे यावर अवलंबून असलेले सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी आपली सिस्टम बंद ठेवणेच योग्य समजले. बघता बघता रूग्णालय, एअरपोर्ट, न्यूज चॅनेल, शेअर मार्केट, सुपरमार्केट, बँक सगळ्याच ठिकाणी संगणकाची स्क्रिन निळी झाली. बँकांचे काम थांबले. शेअर मार्केट बंद झाले. विमानांचे उड्डान रद्द झाले. मुंबई विमानतळावरील उड्डाणे रद्द झाली आहेत. शिवाय बुकिंग, चेक-इन, बोर्डिंग पासवर प्रवेश या सुविधाही प्रभावित झाल्या आहेत. काही एअरलाईन्सनी प्रवाशांना हाताने लिहिलेले बोर्डिंग पास देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे त्यांनी प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याची विनंती केली आहे. हाताने बोर्डिंग पास देण्याची पद्धत कम्प्युटर प्रचलित होण्याआधी वापरली जात होती. आता पुन्हा एकदा हाताने बोर्डिंग पास लिहिण्याची वेळ आली आहे. मायक्रोसॉफ्टने या समस्येची अडचण देशभरात आली. भारतातील इंडिगो, स्पाइसजेटसह अनेक विमान कंपन्यांची विमाने उड्डाणे रद्द करावी लागली, तर काही उड्डाणे उशीरा झाली आहेत. काही एअरलाइन्स कर्मचारी मॅन्युअली प्रवाशांची तपासणी करू लागले.

क्राऊडस्ट्राईक आणि ब्लूस्क्रीन समस्येमुळे ऑनलाईन जग थांबले 

या घटनेचा सर्वात जास्त प्रभाव अमेरिकेवर झाला आहे. अमेरिकेतील अत्यावश्यक सेवा ९११ बंद पडली आहे. मायक्रोसॉफ्टला क्राऊडस्ट्राइक ही फर्म अडव्हान्स सायबर सिक्युरिटी देते. त्यांच्या अपडेटच्या गडबडीत हा सर्व प्रकार झाला आहे. याचा परिणाम मोठमोठ्या कंपन्यांवर झाला. अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि जर्मनीमध्ये बँकिंग, टेलिकॉम, मीडिया आउटलेट आणि एअरलाइन्सच्या सेवांवरही परिणाम झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने सांगितले की, देशातील अनेक कंपन्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे स्काय न्यूज चॅनलने ब्रिटनमध्ये प्रसारण बंद केले आहे. आज सकाळपासून वाहिनीचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही. केनिया आणि युक्रेनमधील बँकांनी काही डिजिटल सेवांसह अडचणी नोंदवल्या, ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटमध्ये पेमेंटमध्ये समस्या होत्या, मोबाइल फोन वाहक विस्कळीत झाले आणि अनेक कंपन्यांमधील ग्राहक सेवा खाली आल्या. नेदरलँड्स आणि ब्रिटन या दोन्हीकडील अहवालांनी सुचवले आहे की आरोग्य सेवा या व्यत्ययामुळे प्रभावित झाल्या आहेत,

'ब्लू स्क्रीन ऑफ डेथ' मुळे अनेक समस्या  

ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ही एक गंभीर स्क्रीन समस्या आहे जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर दिसते. हे तेव्हा घडते जेव्हा सिस्टम गंभीर समस्येमुळे क्रॅश होते जे त्यास सुरक्षितपणे कार्य करण्यापासून प्रतिबंधित करते. जेव्हा ही त्रुटी येते, तेव्हा संगणक आपोआप रीस्टार्ट होतो आणि सेव्ह न केलेला कोणताही डेटा गमावला जाण्याची शक्यता असते.

क्राउडस्ट्राईक आणि क्राऊडस्ट्राईक फाल्कन (Crowdstrike and Crowdstrike Falcon)

क्राउडस्ट्राईक ही एक अमेरिकन सायबर कंपनी आहे. खरेतर ही एख सेक्युरिटी कंपनी आहे, जी कंपन्यांना आयटी सुरक्षा प्रदान कऱण्याचं महत्त्वाचे काम करते. इंटरनेच्या मदतीने काम करणार्‍या कंपनीला हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्याचं काम क्राउडस्ट्राईक करते. कंपन्यांना हॅकर्स, सायबर हल्ला, डेटी लीकपासून वाचवणं हे क्राऊडस्ट्राईकचे मुख्य काम आहे. यामुळे या कंपनीने जगभरातील प्रमुख मोठ्या बँक, विद्यापीठं आणि सरकारी यंत्रणा ग्राहक आहेत. नुकतंच सायबर जगात मोठे बदल झाले आहेत. हॅकर्सकडून हल्ले वाढल्याने अनेकजण क्राऊडस्ट्राईक सारख्या कंपन्यांवर अवलंबून असतात. क्राऊडस्ट्राईक कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपैकी क्राऊडस्ट्राईक फाल्कन एक आहे. कंपनीनुसार, क्राऊडस्ट्राईक फाल्कन युजर्सना रिअल टाइम सायबर हल्ल्‌याची माहिती देतो. यासह हायपर ऍक्यूरेट डिटेक्शन आणि ऑटोमॅटिक प्रोटेक्शन ऑफर करते. हजारो कंपन्या याचा वापर करतात. मकॅ-अफीचे माजी कर्मचारी जॉर्ज कर्ट यांनी २०१२ मध्ये ही कंपनी सुरु केली. या कंपनीचा कोणी एक मालक नाही. अनेक खासगी गुंतवणूकदार, संस्था आणि रिटेल यात भागीदार आहेत.

फ्रान्सच्या सायबर सुरक्षा एजन्सी एएनएसएसआयने सांगितले की, हा आउटेज सायबर हल्ल्याचा परिणाम आहे असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे आता सर्वांना सुरक्षित वाटत असले तरी केवळ एखादाछोटासा बदल एक मोठा सायबर क्रॅश घडवू शकतो आणि संपूर्ण जगातील ऑनलाईन व्यवहार ठप्प करू शकतो, हे दाखवून दिले आहे. केवळ ऑनलाईन व्यवहारांसाठी किंवा त्याच्या सुरक्षेसाठी केवळ एकाच कंपनीवर अवलूंबन राहणे योग्य नाही, हे सुद्धा आता जगातील अनेक कंपन्यांना पटले आहे. कुठलिही समस्या आली तर नेहमी बी प्लान तयार असणे गरजेचे असते, या सायबर क्रॅशच्या वेळी कुठलाही बी प्लान कोणत्याही प्रगत देशात तयार नसल्याचेही स्पष्ट झाले. पण एक प्रश्‍न येथे निर्माण होतो, का म्हणून केवळ एकाच कंपनीवर जगातील सर्व देशांनी अवलंबून रहायचे? कारण पुढील एक-दोन आठवड्यात ही समस्या लोक विसरून जातील. पुन्हा अशी समस्या भविष्यात निर्माण झाल्यास सबंधित सेवा पुरविण्यासाठी आणखी एकाद्या कंपनीचा प्लेटफॉर्म तयार ठेवण्याचे महत्त्व या सायबर क्रॅशने सर्वांना पटवून दिले असावे, हाच मुद्दा विचारात घेऊन आपण या सायबर क्रॅशकडे होकारात्मक दृष्टीने पाहू शकतो.

Yogesh Ramakant Bholane

Director, Nikant Classes, Dhule | Contact: +91 9881307618. I am a passionate professional writer, crafting engaging articles on diverse topics like current affairs, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues for newspapers, magazines, and digital platforms. With over 20 years as a District-Level Trainer at the Maharashtra Centre for Entrepreneurship Development (MCED), I’ve delivered hundreds of training sessions, inspiring and guiding thousands of young entrepreneurs across Maharashtra. I’m also skilled in video editing, VFX, website development, and blogging, bringing creativity and technical expertise to every project. At Nikant Classes, we empower students with courses for Scholarship, NTS, MTS, Manthan, Jawahar Navodaya, and regular classes for State Board, CBSE, and ICSE.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने