पॉलीटेक्नीक डिप्लोमाचा के-स्कीम अभ्यासक्रम

पॉलीटेक्नीक डिप्लोमाचा के-स्कीम अभ्यासक्रम

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) हे महाराष्ट्र सरकारचे एक स्वायत्त बोर्ड आहे जे राज्यातील डिप्लोमा स्तरावरील तांत्रिक शिक्षणाशी संबंधित बाबींचे नियमन करण्यासाठी अनिवार्य आहे. अभ्यासक्रम विकास- विद्याशाखा विकास कार्यक्रम, विद्यार्थी विकास उपक्रम, उद्योग-संस्था परस्परसंवाद, शैक्षणिक देखरेख आणि विविध ऑनलाइन मूल्यमापन क्रियाकलापांद्वारे कार्यक्षम अंमलबजावणी धोरणे हे एमएसबीटीई चे महत्त्वपूर्ण कार्य आहे. अलीकडच्या काळात, एमएसबीटीई ने कौशल्य विकास उपक्रमांमध्ये प्रवेश केला आहे, अशा प्रकारे त्याचे क्षितिज आणि सेवेचे क्षेत्र विस्तृत केले आहे. तथापि, डिप्लोमा विद्यार्थ्यांकडून अपेक्षेनुसार उद्योगाच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमात सुधारणा करणे ही नितांत गरज बनली आहे आणि रोजगारक्षमतेसाठी एक अतिशय महत्त्वाचा पॅरामीटर बनला आहे. याच उद्देशाने एमएसबीटीई नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत के-स्कीम लागू केली आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सुधारित पदविका अभ्यासक्रम: के-स्कीम

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विविध एआयसीटीई मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम विकसित करण्यात येऊन मंडळाशी संलग्नित संस्थांमार्फत राबविण्यात येतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींचा अंतर्भाव करुन सध्याच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन सुधारित पाठ्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून टप्प्या-टप्प्याने राज्यात राबविण्यात येत आहे.सदर अभ्यासक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने के-स्कीम या नावाने संबोधले आहे. नविन अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्‌ये पुढील प्रमाणे आहेत:-

अध्यापनाकरिता व परीक्षेत उत्तरे लिहिण्याकरिता इंग्रजी व मराठी भाषेचा पर्याय

नवीन अभ्यासक्रम हा परिणाम आधारित (आऊटकम बेस्ड) असुन, क्रेडिट सिस्टम वर आधारित आहे. विद्यार्थ्याकरिता विषयांचे आकलन व परीक्षा देणे सुकर होण्याच्या दृष्टीने, अध्यापनाकरिता व परीक्षेत उत्तरे लिहिण्याकरिता द्विभाषिकेचा पर्याय (इंग्रजी व मराठी) उपलब्ध करून देण्यात आला आहे व मंडळाच्या संकेत स्थळावर द्विभाषिक शिक्षण सामुग्री टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मल्टीपल एन्ट्री - मल्टीपल एक्झिटची तरतूद

विद्यार्थ्यांना आवडी नुसार शिक्षण घेण्याकरिता मार्ग बदलणे, तसेच पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या टप्प्यानुसार योग्य रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून मल्टीपल एन्ट्री - मल्टीपल एक्झिट ची तरतूद करण्यात आली आहे. प्रथम वर्षाअंती एक्झिट करणार्‍या विद्यार्थ्यांना (सर्टीफिकेट ऑफ व्होकेशन), व्दितीय वर्षा अंती एक्झिट करणा-या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन व्होकेशन व तृतीय वर्षांअंती डिप्लोमा इन इंजीनिअरींगची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच व्दितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाकरिता मल्टीपल एन्ट्रीची तरतूद करण्यात येत आहे.

विविध उपक्रमांचा समावेश

विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोणातून मंडळाने खालील नमुद विविध उपक्रमांचा / विषयांचा समावेश केलेला आहे. 

सोशल ऍण्ड लाईफ स्कील या विषयातून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार फायनान्सीअल लिटरसी, युनिव्हर्सल ह्युमॅन व्हल्यू उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार स्थानिक गरजांना अभ्यासून त्यावरिल तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या संधी, सामाजिक सामुदायिक सेवेचा पर्याय( एनएसएस ) या सर्व बाबींची अभ्यासक्रमात तरतूद करण्यात आली आहे.तसेच योगा, हेल्थ ऍण्ड वेलनेस या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.पर्यावरण संवर्धन संबंधीत बांधिलकोचे ज्ञान असण्याकरिता एनव्हीरॉनमेंट ऍण्ड सस्टनॅबिलीटी या विषयाचा अंतर्भाव अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानपरंपरा ( इंडीयन नॉलेज सिस्टीम) विषयाची माहिती विविध विषयांमध्ये अंतर्भुत करण्यात आली आहे. लोकशाहिचे मुल्य रूजविण्यासाठी भारतीय संविधानावर आधारित इसेन्स ऑफ इंडीयन कॉन्स्टीट्युशन या विषयाचा समावेश केला आहे.

कामाचे योग्य नियोजन करण्यात यावे तसेच उद्योेजक होण्याकरिता प्रेरणा मिळावी या दृष्टीकोणातून मॅनेजमेंट तसेच एंट्रप्रुनरशीप ऍण्ड स्टार्टअप विषयांचा अंतर्भाव करण्यात आला. विषयांचे आकलन व प्रेझेंटेशन स्कील वाढविण्याकरिता सेमिनार या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्यात टेक्निकल स्कील रूजविण्याकरीता पाठ्याक्रमातील उपक्रमांमध्ये मायक्रो प्रोजेक्ट अंतर्भाव तसेच कॅपस्टोन प्रोजेक्ट या विषयाद्वारे विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करणे, त्याचे सादरीकरण करणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

इंडस्ट्रीयल ट्रेनिंग

औद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण (इंडस्ट्रीयल ट्रेनिंग) हे या आधीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवडयांच्या कालावधीबरून सध्याच्या अभ्यासक्रमात किमान १२ आठवड्यांचे करण्यात आले आहे.

काही विषयांच्या ऑनलाईन परीक्षा

परीक्षेचा ताण कमी होऊन परीक्षा सुकर होण्याच्या दृष्टीने बेसिक सायन्स आणि अपलाईड सायन्स या दोन विषयांच्या परीक्षा ऑनलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा अंतर्भाव के-स्कीम मध्ये केलेला आहे.

पास होणे आता सोपे

विषयातिल सैद्धांतिक परीक्षेत उत्तीर्ण होणेकरीताचे याआधीचे निष्कर्ष शिथिल करून के-स्कीम मध्ये सैद्धांतिक परीक्षा ( एण्ड सेम थेअरी एक्झाम) व चाचणी परीक्षा (टेस्ट एक्झाम )यांच्या एकत्रित गुणांवर करण्यात आले आहे.

संपूर्ण अभ्यासक्रम आता १३२ क्रेडीटचे

प्रत्येक सत्र हे २० ते २२ क्रेडीटचे असून एकूण संपुर्ण सहा सत्रांचा पदविका अभ्यासक्रम हा १२० ते १३२ क्रेडीटचा बनला आहे.

डिजिटल मीडियाचा प्रभावी उपयोग

डिजिटल मीडिया म्हणजेच एमओओशीएस चा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने पाठ्याक्रमातील उपक्रमांमध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेल्फ असेसमेंट लर्नींग

विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरीता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (सेल्फ असेसमेंट लर्नींग) या नवीन अभ्यासक्रमामध्ये होणार आहे.

इमर्जिॅग ट्रेण्ड इन रिसपेक्टिव्ह प्रोग्राम

सततच्या बदलणार्‍या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अद्यावत करणेकरिता इमर्जिॅग ट्रेण्ड इन रिसपेक्टिव्ह प्रोग्राम या विषयाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे.

नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आणि ऍकेडेमिक बँक ऑफ क्रेडीट चा समावेश

एनसीआरएफ (National Credit Framework) मार्गदर्शत तत्त्वांनुसार मंडळाने क्रेडीट ऍक्युमुलेशन सिस्टीम अंगिकारली असून एनएडी (National Academic Depository) च्या ऍकेडेमिक बँक ऑफ क्रेडीट (ABC) मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले क्रेडीटस् जमा करण्यात येत आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थ्याचे एक डिजीटल खाते सुरू होईल. ज्यात त्याने जो अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानुसार क्रेडिट्स डिजीटल पद्धतीने विद्यार्थ्यांच्या ऍकेडेमिक बँक ऑफ क्रेडीट (एबीसी) खात्यामध्ये जमा होतील. विद्यार्थ्यांना त्यांनी पुर्ण केलेल्या प्रत्येक सत्राचे क्रेडिट्स मिळण्याची तरतूद केली आहे. इतकंच नाही तर हे क्रेडिट्स एका संस्थेतून दुसर्‍या संस्थेत सहजपणे हस्तांतरित करता येतील. यामुळे इतर शिक्षण घेताना पुर्ण केलेले विषय पुन्हा शिकण्याची गरज नसल्याने अंतर्गत शिक्षणात गती प्राप्त होईल.

सदर सुधारित अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासुन प्रथम सत्र प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात आला असून संपुर्ण सहा सत्रांचा अभ्यासक्रम टप्प्या-टप्प्याने लागू करण्यात येत आहे.
Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने