हेल्थ टिप्स - 1


Health Tips - 1

फळे आणि भाजीपाला यांचे थोडक्यात उपयोग 

फळे हे निसर्गातील पोषक तत्वांचा खजिना आहेत, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात जे त्यांना संतुलित आहाराचा एक आवश्यक भाग बनवतात. जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने युक्त, फळे निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीसाठी उपयुक्त अन्न आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि निरोगी पचनास समर्थन देण्यापासून ते जुनाट आजारांचा धोका कमी करणे आणि नैसर्गिक ऊर्जा प्रदान करणे, फळांचे फायदे असंख्य आहेत. या लेखात, आम्ही फळांच्या  आरोग्य फायद्यांचा अभ्यास करू. चला तर मग जाणून घेऊया की फळे तुमचे आरोग्य आणि तुमचे जीवन कसे बदलू शकतात. 

छातीच्या धडधडसाठी पिस्ता - Pistachios for chest pain

तीव्र स्वरूपाच्या तणावामध्ये माणसाची छाती धडधड करते, ह्दयाचे ठोके वाढतात आणि ठोके इतके वेगवान होतात की त्याचे शरीरावर अनेक विपरीत परिणाम होतात. अशा समस्यांना ज्यांनी नेहमी सामोरे जावे लागते, त्यांनी दररोज साधारणपणे दहा ते बारा पिस्ते खावेत. दुधात पिस्त्याची पूड आणि मध घालून सेवन केल्यास मज्जातंतूंना बळकटी येते, अशक्तपणामुळे आलेली काम दुर्बलता जागृत होते. पिस्त्याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्तीत वाढ होते, ह्दयाचे स्नायू बळकट होतात, शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. लोह विपूल प्रमाणात असल्यामुळे पिस्ता खाल्ल्यामुळे रक्तात वाढ होते.

पोकळ्यातील तंतुमय पदार्थ 

पोकळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचे तंतूमय पदार्थ असल्यामुळे ही भाजी पोटाचे विकार Stomach disorders असणार्‍या व्यक्तींनी नियमित सेवन केली पाहिजे. यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि पोट साफ रहाते. लहान मुलांचे पोट खराब झाल्यास त्यांना पोकळ्याचा रस दिला तरी चालतो. तोंडात किंवा घशात फोड आल्यास किंवा अल्सरसारखा विकार झाल्यास पोकळा वनस्पतीचा अर्क उपयुक्त असतो. या अर्काने गुळण्या केल्यास आराम मिळतो.

गाजराचा रस - Carrot Juice

गाजराच्या रसाचे रोज सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढते, त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे वारंवार होणार आजार होत नाहीत. विशेष म्हणजे गाजरातील टॉकोकिनीन हा घटक मधुमेह कमी करण्यास मदत करतो. तसेच गाजरच्या रसात अर्ध्या प्रमाणात पालकाचा रस, चिमूटभर सैंधव मीठ आणि जिरे मिसळून नियमितपणे घेतल्यास मधुमेह होत नाही. गाजराचे नियमित सेवन हे मूळव्याध, पोटाचे विकार आणि मुतखडा या विकारांवर औषधासारखे काम करते.

बहुउपयोगी पेरू - Multipurpose guava

पेरूचे केवळ फळच नाहीतर झाडाचे साल आणि पानही उपयुक्त असतात. झाडाची साल आणि पानांचे चूर्ण जखमा किंवा फोडींवर जंतूनाशक म्हणून लावतात. कोवळ्या ताज्या पानांचा काढा पचनससंस्थेच्या तक्रारींवर उपयुक्त असतो. उलट्या आणि जुलाबाला प्रतिबंध Prevention of vomiting and diarrhea करण्यासाठीही हा काढा उपयोगी असतो. सांधेदुखीवर पाला वाटून लावतात. पानांच्या किंवा फुलांच्या काढ्याचा उपयोग दम्यावर होतो. दातांची दुखणी, तोंडातले येणे यावर काढ्याच्या गुळण्या केल्यास गूण पडतो. पेरू नियमित खाल्ल्याने हिरड्या आणि नाकातून रक्त येणे थांबते. दात मजबूत होतात.श्‍वासाचा दुर्गंध दूर होतो.सांधेदुखीस आराम मिळतो.

बोराची साल आणि फळ

बोराची साल अतिसारावर उपयुक्त असते. या झाडाची सहज निघणारी साल उगाळून घेतल्यास आमांश आणि जुलाब थांबतात. सालीचे चूर्ण वस्त्रगाळ करून मधातून दिल्यावरही जुलाब थांबतात.बोर फळात जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात असून जीवनसत्त्व अ आणि ब असते. सफरचंद आणि बोराची तुलना केल्यास बोरामध्ये सफरचंदापेक्षा जीवनसत्त्व क, कॅरोटिन,प्रथिने आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.

सीताफळाच्या बीया Custard apple seeds

सीताफळाच्या बीयांची पूड उवामारक आहे. म्हणून ग्रामीण भागात स्त्रिया डोक्यातील उवा मारण्यासाठी शिकेकाईमध्ये सीताफळाच्या बियांचे चूर्ण मिसळतात. या चुर्णामुळे कोंडाही कमी होतो.

खजुरातील सारक गुणधर्म Nutritional properties of dates

नियमित खजूर खाल्ल्याने आतड्यातील अपायकारक जंतू मरतात, तसेच खजुरातील निकोटीनमुळे आतड्यांच्या तक्रारी दूर होतात. खजुरातील सारक गुणधर्मामुळे मलाविरोधाचा त्रास दूर होतो.

लिंबूमधील व्हिटॅमिन सी Vitamin C in lemons

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व क असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जखमा लवकर भरून येतात. तसेच स्कर्व्हीवरील रामबाण उपाय म्हणजे लिंबूचे नियमित सेवन होय. याशिवाय त्यात सायट्रिक ऍसिड, फलशर्करा, कॅल्शियम, फॉस्फरसही असते. गॅसेस, अपचन, आंबट ढेकर, वारंवार उचकी यावर लिंबूरस आणि खाण्याचा सोडा घेतला की बरे वाटते.

कॉफी पिण्याचे अनेक फायदे benefits of drinking coffee

कॉफी प्यायल्यानं अंगात भरपूर उष्णता निर्माण होते. त्यामुळे थंडीपासून रक्षण होते. कॉफीमुळे सुस्ती आणि आळस दूर होऊन शरीरात उत्साह निर्माण होतो. कॉफी प्यायल्यानंतर कॉफीचे उत्सर्जन मूत्रावाटे होते. मूत्रमार्गातील रक्तवाहिन्यांचा विस्तार होतो. त्यामुळे लघवी तटणे, बारीक मूतखडा यामुळे लघवीच्या मार्गातील जळजळ, आग, वेदना होत असेल तर कॉफी प्यायल्याने त्रास तात्पुरता कमी होण्यास मदत होते.

अतिआम्लतेवर नाशपाती - Pears for hyperacidity

पचंनसंस्थेतील पेशींना नाशपाती कार्यान्वित करते म्हणून पोटांच्या विकारावर नाशपातीचा रस दिला जातो. जठरात स्त्रवणारे अंतस्त्राव कमी-अधिक स्त्रवणाने पोटात जे बिघाड होतात त्यावर नाशपाती गुणकारी औषध आहे. तसेच अतिआम्लतेमुळे होणारे विकार नाशपाती आणि पपई खाल्ल्याने कमी होतात.

पोटांच्या विकारावर अंजीर Figs for stomach disorders

अंजीराच्या नियमित सेवनाने शौचाला साफ होते, पोटाच्या तक्रारी सहसा उदभवत नाहीत. अंजीराच्या बियांमुळे आतड्यांचे कार्य Intestinal function व्यवस्थित होते. त्यामुळे पचन नीट होऊन सर्व मळ निघून जाण्यास मदत होते. मूळव्याधीत भिजविलेला अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळ-संध्याकाळ २-२ अंजीर खाल्ल्यास मूळव्याध खात्रीशीर बरी होते.

पपईचा गर Papaya juice

चेहर्‍यावरील काळपटपणा, वांग, सुरकूत्या ( Darkness on the face, wang, wrinkles) इ. पपईचा गर लावल्यामुळे कमी होतात. चेहर्‍यावर चकाकी येते आणि मुरूमांना आळा बसतो.

आलुबुखार मधील ऍण्टीऑक्सीडंट - Antioxidants in plums

आलुबुखार फळात ऍण्टीऑक्सीडंटचे- antioxidants प्रमाण भरपूर असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरसारख्या रोगापासून दूर राहता येते. रोज एक ग्लास आलुबुखारचा ज्यूस प्याल्याने शरीराला आवश्यक असणार्‍या जीवनसत्त्व आणि खनिजांची पूर्तता होऊ शकते.विशेष म्हणजे फळातील पोटॅशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.

अक्रोडचे नियमित सेवन Regular consumption of walnuts

अक्रोड जर अंजीर आणि मनुकांसोबत खाल्ल्यास मेंदूला परिपूर्ण टॉनिक दिल्यासारखे होते. म्हणून विद्यार्थ्यांनी, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांनी आणि कम्प्युटर प्रोग्रामींग सारख्या ठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी अक्रोडचे सेवन नियमित करायला हवे.

कच्चे हिरवे वाटाणे - Raw green peas

कच्चे हिरवे वाटाणे खाल्ल्यास बद्धकोष्टता - Constipation दूर होते.अशक्त व्यक्तींनी हिरव्या वाटाण्यांचे नियमित सेवन केल्यास रक्त वाढते. याशिवाय हिरवे वाटाणे प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. म्हणून भरपूर व्यायाम आणि शारीरिक कष्ट करणार्‍या व्यक्तींनी वाटाण्याचा रोजच्या आहारात उपयोग करायला हवा.

तुतीच्या फळांचा रस - Mulberry fruit juice

ज्या व्यक्तींना दिवसभर थकल्यासारखे वाटते, त्वचा निस्तेज दिसते, ऍनिमियाची लक्षणे आढळतात, ह्दयासंबधी तक्रारी असतात अशा व्यक्तींनी तुतीच्या फळांचा रस सेवन केल्याने रक्तवृद्धी होऊन लाभ होतो.

पपईचा उपयोग

पपईतील पेपेन आतड्यांच्या अनेक विकारांवर उपयुक्त असते. जळजळ होणे, आतड्यातील दाह, यकृताच्या तक्रारी त्यामुळे कमी होतात. जुनाट मलाविरोध, रक्ती मूळव्याध, अतिसार यावर पपई उत्तम औषध आहे. म्हणून पोटातील अन्नरोग, मंदाग्नी, भूक न लागणे, अजिर्ण यावर पपईचा उपयोग केल्यास फायदा होतो.

Health Tips
Vegetable health tips


भाजीपाला आणि फळांची थोडक्यात उपयुक्तता 

  • चेहर्‍यावर वाटाण्याच्या आट्याचे उबटन लावल्यास चेहर्‍यावरील डाग नाहीसे होण्यास मदत होते. चटका लागलेल्या ठिकाणी हिरव्या वाटाणा कुटून लावल्यास चटक्याच्या वेदना कमी होतात.
  • टोमॅटोच्या नित्य सेवनाने वजन नियंत्रणात राहते.यात पिष्टमय पदार्थ कमी असल्याने लघवीतील साखरेचे नियंत्रण होते, त्यामुळे मधुमेहीही हे फळ खाऊ शकतात.
  • आंब्याचे नियमित सेवन केल्यास कांती उजळ होते, त्वचेचे रोग बरे होण्यास मदत होते, पचनशक्ती सुधारते, स्नायूंना बळकटी येते, वारंवार येणारी सर्दी आटोक्यात येते आणि सप्तधातु बलवान होतात.
  • पेंडखजूर बुद्धीवर्धक असल्याने विद्यार्थ्यांनी रोज चार पेंडखजूर खावेत. खजूर खाताच एकदम ताजेपणा वाटतो, कारण खजूरात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज अशी दोन्ही प्रकारची शर्करा असते.
  • आजारातून बरे झालेल्या, खूप श्रम करणार्‍या व्यक्तींना किंवा वृद्धांना ताबडतोब उर्जा मिळण्यासाठी शक्तीवर्धक फळ म्हणून अंजीर देतात.
  • पोटाच्या तक्रारींवरही बदाम कार्य करतो. झोपण्याच्या अगोदर रात्री बदाम खाल्ल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. बदामाच्या नियमित सेवनाने जुनाट असणारा मलाविरोधही कमी होतो.
  • अननसाच्या नियमित सेवनाने उष्णतेमुळे होणारे पित्त कमी होते, मन प्रफुल्लित होते आणि पोटात चूकून गेलेले केस बाहेर टाकले जातात. अननसाच्या तुकड्यांवर मिरेपूड आणि साखर घालून खाल्ल्यास आम्लपित्त कमी होते.
  • आजारपणानंतर क्षीणता जाणवत असेल तर सीताफळाच्या नियमित सेवनाने अशक्तपणा दूर होऊन अंगात शक्ती निर्माण होते.
  • स्ट्रॉबेरीत सायट्रिक ऍसिड, फॉलिक ऍसिड आणि ऍसकॉरबिक ऍसिड असल्याने कुपोषण सारख्या समस्येत स्ट्रॉबेरी वापरता येते.
  • गाजराचा रस काढून तो त्वचेवर चोळल्यास खरबरीत आणि सुकी त्वचा सतेज आणि गुळगुळीत बनते.
  • मूत्रमार्गाच्या - Urinary tract तक्रारींवर टोमॅटो उपयुक्त असते. मूत्रपिडांना हळुवारपणे उद्दीपित करून प्रतिविषाचा निचरा टोमॅटोमुळे होतो.
  • केळीमध्ये असणारे काही घटक अल्कलाईन असल्यामुळे जठरात आम्लत्व वाढत नाही. त्यामुळे क्रोनीक अल्सर असणार्‍यांनी केळी खावे.
  • डाळिंबाच्या रसाने तोंडाची दुर्गंधी, दातातून येणारे रक्त ( Bad breath, blood coming from the teeth) बंद होते आणि कंठ मोकळा होतो.
  • केसांसाठी आवळ्याइतके उपयुक्त टॉनिक नाही म्हणून केसांसाठी आवळ्याला उत्तम कंडिशनर म्हटले जाते. आवळ्याचे तेलही केसांच्या वाढीकरिता अत्यंत गुणकारी असते.
  • द्राक्षाच्या सेवनाने चयापचय क्रिया सुधारत असल्याने ह्दयरोग्यांसाठी द्राक्ष वरदान आहे.
  • फणसाच्या झाडाचे चूर्ण अल्सरच्या रूग्णांसाठी रामबाण औषधीचे काम करते. तसेच पानांचा रस तयार करून पिल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो. हा रस ब्लडप्रशेच्या रूग्णांनाही लाभदायक असतो.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने