शेततळे उभारणीसाठी हवा होकारात्मक दृष्टीकोन

शेततळ्यांबाबत हवा होकारात्मक दृष्टीकोन
farm ponds need positive attitude

राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २००८-०९ मध्ये राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे निर्मीती योजना सुरू केली. ही योजना राज्यातील ८५ टक्के कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायक ठरली. त्यामुळे हजारो हेक्टर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आली आहे. याप्रमाणे शेततळे हे एकप्रकारे शेतीसाठी वरदानच ठरले आहेत. शेततळे ही कल्पना भारतातील शाश्वत शेतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून उदयास आली आहे, ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात. हे छोटे, मानवनिर्मित शेततळे जलस्रोतांचे व्यवस्थापन, पिकांची लागवड आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या पद्धतीत बदल करत आहेत. भारताच्या कृषी क्षेत्राला हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि मातीचा ऱ्हास यामुळे वाढत्या दबावाचा सामना करावा लागत असताना, उत्पादकता वाढवण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी शेततळे हे शेतकऱ्यांसाठी एक अपरिहार्य साधन बनले आहेत.

{tocify} $title={Table of Contents}

शेततळे शेतीसाठी वरदान

महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत दरवर्षी पुराने प्रचंड नुकसान होते, तर दुसरीकडे हजारो गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. भारतातील जवळपास ५७ टक्के क्षेत्र आजही कोरडवाहू आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास ८४ टक्के क्षेत्र जिराईत आहे. कमी पावसाच्या प्रमाणामुळे जमिनीच्या भुगर्भातील पाण्याची पातळी खालावली जात असल्याने त्याचा परिणाम पीकवाढ व उत्पादनावर होत आहे. या गोष्टीवर काही उपाय शोधायचा तर पावसाचा थेंब न थेंब जमिनीत मुरविण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे हीच काळाची गरज बनली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शेततळे निर्माण करणे होय.

शेततळे उभारणी

शेतजमिनीच्या वरील बाजूकडून पावसाचे वाहून येणारे पाणी संकलित करून आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. प्रत्येक शेतीक्षेत्रामध्ये चढउतार लक्षात घेता एखादी तरी जागा अशी असतेच , की ज्या ठिकाणी प्रत्येक पावसाळ्यात थोड्या अधिक प्रमाणात पावसाचे पाणी साचते. तोच भाग थोड्याफार प्रमाणात खोलगट करून पावसाचे येणारे पाणी शास्त्रोक्त पद्धतीने साठवल्यास शेततळे तयार होते. शेततळे उभारण्यासंबधीची योजना कृषि विभागातर्फे राबविण्यात येेते आणि या योजनेचा संपूर्ण खर्च शासन करते. सर्वसाधरणपणे ३० मीटर रूंद, ३० मीटर लांब व ३ मीटर खोलीचे शेततळे घेण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने ८२ हजार २६० रूपयांचे अनुदान देण्यात येते.

शेततळ्यासाठी जागा

शेततळ्यासाठी जागा निवडणे फार महत्त्वाचे असते. शेतकर्‍यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे उभारणे अपेक्षित असते. शेततळ्यासाठी निवडलेली जागा अशी असावी की त्या जागेजवळ शेतातील सर्व पाणी एकत्रित होऊ शकेल. त्यासाठीखोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन योग्य असते. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण अशी जागा निवडल्यास तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजुला थोड्या अंतरावर खोदणे केव्हाही चांगले असते. शेततळी ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे, तर दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध घालून पाणी अडवून शेततळे तयार करणे. शेततळ्याचे आकारमान ठरवितांना पडणारा पाऊस, त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळाकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्‍चित करावी. शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.

शेततळे बांधतांना 

शेतळ्यांमुळे अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या शेतात क्रांती घडविली आहे. कारण पावसाच्या लहरीपणामुळे वेळोवेळी निर्माण होणार्‍या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळ्यातील पाणी उपयोगी पडते. यामुळे पाण्याअभावी नष्ट होणारी पिके वाचविली जाऊ शकतात. खरंतर संरक्षित सिंचनाची गरज त्यातून भागविली जाते. परंतु शेततळ्यातील पाणी वापरतांना खूप काळजी घेणे फायदेशीर असते. त्यासाठी पंपसेट, पाईपलाईन व तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा, जेणेकरून कमीत कमी पाण्याचा उपयोग जास्तीतजास्त क्षेत्रावर कार्यक्षमरित्या करता येईल. पाणी देतांना ते केव्हा, कसे व किती प्रमाणात द्यावे याही गोष्टीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्तीतजास्त क्षेत्र ओलिताखाली येईल आणि त्यामुळे निश्‍चित उत्पादन मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहू शकेल. शेततळी उभारणी आणि त्यातील पाण्याच्या वापरासोबत शेततळ्याची निगा राखणे सुद्धा गरजेचे असते. कारण शेततळे हे काळ्या खोल जमिनीवर तयार केले असेल तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते म्हणून शेततळे बनविण्यापूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणे करून पावसाच्या वाहून येणार्‍या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. तसेच शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २२१ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते, त्या ठिकाणी गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्‌ड्यामध्ये साचेल. तसेच शेततळ्यासाठी पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी अस्तरीकरण करणे आवश्यक असते. अस्तरासाठी बेन्टोनाईट, माती सिमेंट मिश्रण, दगड विटा चिकनमाती किंवा प्लास्टिक फिल्मचा उपयोग करता येतो. प्लास्टिक ( सिल्पोनीनचे कापड) वापरतांना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. तसेच सिमेंट व मातीचे प्रमाण १:८ व जाडी ५ से.मी. ठेवावी. शेततळे तयार केल्यानंतर जंगली प्राणी सिल्पोनीनचे कापड खराब करू शकतात. तसेच गाई म्हशीसुद्धा शेततळ्यात पडू शकतात. हे सर्व टाळण्यासाठी शेततळ्यात चारही बाजूंनी कुंपण करणे आवश्यक असते.

शेतळ्यांमुळे शेतात क्रांती

शेततळ्यामुळे अनेक शेतकर्‍यांना फायदा झाला. पावसाच्या अनियमीतपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक यशस्वीरित्या घेता येते. याखेरीज शेततळ्याचे अनेक उपयोग आहेत, जसे शेततळ्यामुळे पाणलोट क्षेत्रातील भुगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. पुरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. काही क्षेत्र रब्बी पिकाखाली आणता येते. पाणथळ जमिन सुधारणेसाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो. पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच शेततळ्याचा मत्स्यसंवर्धनासाठीसुद्धा उपयोग होऊ शकतो. कारण अस्तरित शेततळ्यात साठवलेल्या पाण्यात मिश्र मत्स्यसंवर्धन करणे शेतकर्‍यांना सहज शक्य आहे. त्यासाठी शेततळ्यांमध्ये रोहू, कटला या माशांच्या जातींचा वापर संवर्धनासाठी करावा. जवळ जवळ नऊ-दहा महिन्यांच्या संवर्धन काळात माशांपासून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

शेततळ्यांची ही योजना शेतकर्‍यांना एकप्रकारे वरदानच असलीतरी काही शेतकरी मात्र या योजनेचा पूरेपूर लाभ घेण्यास असमर्थ ठरले आहेत. काही ठिकाणी शासनाचे लाखो रूपये खर्च करून तयार झालेली शेततळी निरूपयोगी ठरली आहेत. विशिष्ट ठेकेदार आणि अधिकारी यांनी केवळ अनुदान लाटण्यासाठी शेतकर्‍यांना हाताशी घेऊन वाटेल तेथे शेततळ्यांचे जाळे पसरविले. परंतु शेततळे उभारतांना ठरविण्यात आलेेले नियम डावलून अशी शेततळी तयार झाल्याने आता ती कुचकामी ठरली आहेत. काही ठिकाणी लाभार्थी शेतकर्‍याची संपूर्ण कार्यालयीन प्रक्रिया तळे मंजूर करून खोदकामापर्यंत ठेकेदाराकडूनच अधिकार्‍यांच्या सहकार्याने केली जाते. अशास्थितीत शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान ठेकेदाराला द्यावे लागते. त्यामुळे शेततळे कुठे ऊभारावे याचे नियम असतांना वाटेल त्या ठिकाणी केवळ अनुदान लाटण्यासाठी शेततळे खोदण्यात आली. म्हणून शेतकर्‍यांनी पिकांना अडथळा आणि निरूपयोगी ठरत असलेली शेततळी बुजवून टाकली. यामुळे अशा ठिकाणी आता शेकडो शेततळे केवळ कागदावरच कार्यरत आहेत. सामूहिक शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याकरिता प्लास्टिक फिल्म, तळ्यांना कुंपण आदिंकरिता अनुदान दिले जाते. परंतु काही ठिकाणी कमी प्रतीचा प्लॅस्टिक टाकून सर्वेक्षण हाईपर्यंत प्लॅस्टीक असते, नंतर शेततळ्यात प्लॅस्टिक तर सोडाच, परंतु पाणीही दिसत नाही, अशी अवस्था आहे. तर काहींनी आर्थिक हितापोटी काही ठिकाणी शेततळी नदीपात्रात तयार केली आहेत. अशा काही उदाहरणांमुळे अतिशय चांगल्या अशा या शेततळ्यांच्या योजनेला काही भागात गालबोट लागलेले आहे. परंतु सरकारने या बाबी विचारात घेऊन यापुढे शेततळ्यासाठी अनुदान देतांना विशेष काळजी घेण्याचे ठरविले आहे. केवळ अल्पसा फायदा न बघता ही योजना शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरून शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी कारणीभूर ठरू शकते. म्हणून शेतकर्‍यांनी केवळ अनुदान लाटण्याच्या उद्देशाने न बघता खरोखरच शेतीत फायदा करण्याच्या दृष्टीन शेततळे उभारले पाहिजे. अन्यथा ही योजना सुद्धा इतर अनेक योजनांप्रमाणे शोभेची योजना ठरेेल.

शेततळ्यांचे शेतीसाठी योगदान

शेततळ्यांमुळे पावसाच्या पाण्याची साठवण झाल्याने शेतकरी त्यांच्या पिकांना कोरड्या हंगामात सिंचन करण्यास सक्षम बंटी शकतात. यामुळे अनियमित मान्सूनच्या पावसावर अवलंबून राहणे आणि भूगर्भातील महाग पाणी काढणे या कटकटी कमी होऊ शकतात. शिवाय शेततळे, पीक उत्पादनास चालना,  भूजल पुनर्भरण, मातीचे आरोग्य राखण्यासाठी, पाणी वापर कार्यक्षमता सुधार आणि फायदेशीर जलचरांसाठी निवासस्थान प्रदान करण्यासाठी योगदान देतात. भारत सरकार जलसंधारण आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देत असल्याने, लाखो शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या जीवनमानाला आधार देण्यासाठी शेततळे वाढत्या प्रमाणात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी तयार आहेत.

शेततळ्यामुळे अनेक शेतकर्‍यांना फायदा झाला. पावसाच्या अनियमीतपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक यशस्वीरित्या घेता येते. याखेरीज शेततळ्याचे अनेक उपयोग आहेत, जसे शेततळ्यामुळे पाणलोट क्षेत्रातील भुगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. पुरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. काही क्षेत्र रब्बी पिकाखाली आणता येते. पाणथळ जमिन सुधारणेसाठी शेततळ्याचा चांगला उपयोग होतो. पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच शेततळ्याचा मत्स्यसंवर्धनासाठीसुद्धा उपयोग होऊ शकतो. कारण अस्तरित शेततळ्यात साठवलेल्या पाण्यात मिश्र मत्स्यसंवर्धन करणे शेतकर्‍यांना सहज शक्य आहे. त्यासाठी शेततळ्यांमध्ये रोहू, कटला या माशांच्या जातींचा वापर संवर्धनासाठी करावा. जवळ जवळ नऊ-दहा महिन्यांच्या संवर्धन काळात माशांपासून शेतकर्‍यांना चांगले उत्पादन मिळू शकते.

शेततळे योजनेचा गैरवापर 

शेततळ्यांची ही योजना शेतकर्‍यांना एकप्रकारे वरदानच असलीतरी काही शेतकरी मात्र या योजनेचा पूरेपूर लाभ घेण्यास असमर्थ ठरले आहेत. काही ठिकाणी शासनाचे लाखो रूपये खर्च करून तयार झालेली शेततळी निरूपयोगी ठरली आहेत. विशिष्ट ठेकेदार आणि अधिकारी यांनी केवळ अनुदान लाटण्यासाठी शेतकर्‍यांना हाताशी घेऊन वाटेल तेथे शेततळ्यांचे जाळे पसरविले. परंतु शेततळे उभारतांना ठरविण्यात आलेेले नियम डावलून अशी शेततळी तयार झाल्याने आता ती कुचकामी ठरली आहेत. काही ठिकाणी लाभार्थी शेतकर्‍याची संपूर्ण कार्यालयीन प्रक्रिया तळे मंजूर करून खोदकामापर्यंत ठेकेदाराकडूनच अधिकार्‍यांच्या सहकार्याने केली जाते. अशास्थितीत शेतकर्‍यांना मिळणारे अनुदान ठेकेदाराला द्यावे लागते. त्यामुळे शेततळे कुठे ऊभारावे याचे नियम असतांना वाटेल त्या ठिकाणी केवळ अनुदान लाटण्यासाठी शेततळे खोदण्यात आली. म्हणून शेतकर्‍यांनी पिकांना अडथळा आणि निरूपयोगी ठरत असलेली शेततळी बुजवून टाकली. यामुळे अशा ठिकाणी आता शेकडो शेततळे केवळ कागदावरच कार्यरत आहेत. सामूहिक शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याकरिता प्लास्टिक फिल्म, तळ्यांना कुंपण आदिंकरिता अनुदान दिले जाते. परंतु काही ठिकाणी कमी प्रतीचा प्लॅस्टिक टाकून सर्वेक्षण हाईपर्यंत प्लॅस्टीक असते, नंतर शेततळ्यात प्लॅस्टिक तर सोडाच, परंतु पाणीही दिसत नाही, अशी अवस्था आहे. तर काहींनी आर्थिक हितापोटी काही ठिकाणी शेततळी नदीपात्रात तयार केली आहेत. अशा काही उदाहरणांमुळे अतिशय चांगल्या अशा या शेततळ्यांच्या योजनेला काही भागात गालबोट लागलेले आहे. 

निष्कर्ष

सरकारने वरील बाबी विचारात घेऊन यापुढे शेततळ्यासाठी अनुदान देतांना विशेष काळजी घेण्याचे ठरविले आहे. केवळ अल्पसा फायदा न बघता ही योजना शेतकर्‍यांसाठी एक वरदान ठरून शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी कारणीभूर ठरू शकते. म्हणून शेतकर्‍यांनी केवळ अनुदान लाटण्याच्या उद्देशाने न बघता खरोखरच शेतीत फायदा करण्याच्या दृष्टीन शेततळे उभारले पाहिजे. अन्यथा ही योजना सुद्धा इतर अनेक योजनांप्रमाणे शोभेची योजना ठरेेल.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने