सर्वात उंच कोण - उंट की जिराफ? उंचीबद्दल धक्कादायक सत्य

Camel or Giraffe - Which is Tallest
Camel vs Giraffe: The Ultimate Height Challenge

जेव्हा प्राण्यांच्या जगात उत्तुंग उंचींचा विचार केला जातो, तेव्हा दोन प्राणी अनेकदा लक्षात येतात: उंट आणि जिराफ. हे दोन्ही आश्चर्यकारक प्राणी त्यांच्या प्रभावी उंचीसाठी ओळखले जातात, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणता सर्वात उंच आहे? कोणता भव्य प्राणी सर्वांत उंच म्हणून राज्य करतो? चला या अविश्वसनीय प्राण्यांच्या आकर्षक जगाचे अन्वेषण करू आणि उंट आणि जिराफांच्या जगात डोकावू.

द ग्रेट हाईट डिबेट: उंट विरुद्ध जिराफ

जगत, शरद, नितीन, सतीष, अनिकेत, मंदार असे अपार्टमेंटमधील सर्व मुले मैदानात फुटबॉल खेळत होते. एका प्रसंगी जगतने बॉलला एवढी जोर्‍यात कीक मारलीकी बॉल थेट झाडावर जाऊन फाद्यांमध्ये अडकला. आता बॉल काढणार कसा?खरेतर आता अंधार पडायला आला आहे. खेळ संपण्याची वेळ होतांनाच नेमका बॉल अडकला. हे बघून शरद म्हणाला,

‘‘ माझ्याकडे आता ऊंट असला असता तर त्यावर बसून मी बॉल काढला असता.’’

‘‘अरे ऊंट नाही, जिराफ म्हण, कारण जिराफ सर्वात उंच प्राणी आहे.’’नितीनने माहिती दिली आणि त्यावरून वाद सुरू झाला. काहींचे म्हणणे हाते, सर्वात उंच ऊंट आणि काहींचे म्हणणे होते जिराफ. वाढता गोंधळ पाहून जगतने सर्वांना शांत केले आणि तो म्हणाला,

‘‘नितीनचे म्हणणे बरोबर आहे, जगातील सर्वात उंच प्राणी म्हणजे जिराफ.’’ फक्त एवढे सांगून मित्रांची ज्ञानाची भूक भागणार नाही, हे जगतला माहीत होते, म्हणून तो पुढे म्हणाला,

‘‘जिराफ मुख्यत्वे आफ्रिकेत आढळणारा शाकाहारी प्राणी आहे.जिराफ कळपात राहतो. त्याचे शास्त्रीय नाव जिराफा कॅमलोपॅरार्डालिस असे आहे.जलद गतीने चालणारा या अर्थाच्या ‘झरापा’ या अरबी शब्दापासून जिराफ हा शब्द आलेला आहे. या प्राण्याचा सर्वसाधारण रंग पिवळसर, त्यावर काळसर तांबूस रंगाची विविध आकारांची व आकारमानांची चकदळे असतात. खालची बाजू फिक्कट रंगाची असून तिच्यावर ठिपके नसतात. याची मान खूप लांब असून नराच्या मानेवर ताठ उभ्या केसांची आयाळ असते. नर व मादीच्या डोक्यावर आखूड, बोथट शिंगांच्या एक किंवा दोन जोड्या असतात व शिंगांवर जाड त्वचेचे आवरण असते. शिंगे १०१५ सेंमी. लांब; शेपूट झुपकेदार; पाय लांब, मजबूत आणि पुढचे पाय मागच्यांपेक्षा जास्त लांब असतात. प्रत्येक पायाला दोन मोठे खूर असतात. त्याचे घ्राणेंद्रिय, श्रवणेंद्रिय व दृष्टी तीक्ष्ण असते. डोळे मोठे, गडद तपकिरी रंगाचे व कान लांब असतात. जिराफाला आवाज काढता येत नाही अशी समजूत आहे, पण तो कण्हल्यासारखा किंवा बेंबें असा बारीक आवाज काढतो. जिराफाची जीभ ४५ ते ५० सेंमी. लांब व ती तोंडाच्या बाहेर काढता येते; झाडांची पाने तोडण्याकरिता तिचा उपयोग होतो. विशेष म्हणजे तिने जिराफ आपले कान साफ करू शकतो. खरे तर जिराफ भित्रा, गरीब, शांत व निरुपद्रवी आहे. मात्र स्वत:च्या संरक्षणासाठी जिराफ शत्रूला पायांनी जबरदस्त फटकारे मारतो.

आता आपण आपल्या मूळ मुद्याकडे येऊ या, जिराफ हा जगातील सर्वांत उंच चतुष्पाद आहे. सगळ्यात उंच आणि लांब मानेचा प्राणी म्हणजे जिराफ.नर जिराफाची सवेसाधारण उंची १६ ते १८ फूट असते. काही जिराफ १९ फुटापर्यंत उंच असतात. लांब मानेमुळे जिराफांना झाडांचा पाला सुलभपणे खाता येतो. जिराफांची नजर खूप तीक्ष्ण असते आणि उंच मानेमुळे तो खूप दूरचं पाहू शकतो. या जिराफावर बसून नितीन झाडावर अडकलेला बॉल कसा काढेल, हे त्यालाच ठाऊक, मात्र सर्वात उंच प्राणी हा जिराफच.’’

एवढी माहिती देऊन झाल्यावरही जिराफाविषयी आणखी काहीतरी माहिती मिळेल, या आशेने सर्व मित्र जगतकडे बघत होती. मात्र शतप्रतिशत काळोख पडल्यामुळे बॉलचे उद्या बघू असे जगतने घोषित केले आणि आजचा फूटबॉलचा खेळ विसर्जित झाला.

फूटबॉलचा खेळ आणि जगतने दिलेली जिराफाविषयी माहितीने आपली ज्ञानाची तहान नक्कीच भागली नसेल. म्हणून महाप्रसेद्वारे ऊंट आणि जिराफाविषयी आणखी माहिती खालील प्रमाणे सादर करीत आहोत.

जिराफ (जिराफा कॅमलोपार्डालिस) 

हे पृथ्वीवरील सर्वात उंच सस्तन प्राणी आहेत, ज्यात प्रौढ सामान्यत: उंची गाठतात:-
  • नर: ४.८-५.९ मीटर (१५.७-१९.४ फूट)
  • मादी : ४.३-५.५ मीटर (१४.१-१८ फूट)
  • जिराफचे वजन १,६०० ते ३,००० पौंड (७०० ते १,४०० किलो) दरम्यान असू शकते.
आतापर्यंत नोंदवलेला सर्वात उंच जिराफ जॉर्ज नावाचा नर होता, जो आश्चर्यकारकपणे ५.९५ मीटर (१९.५ फूट) उंच होता.

जिराफला उल्लेखनीय उंची प्रामुख्याने त्यांच्या लांब मान आणि पायांमुळे आहे, ज्यामुळे त्यांना झाडांच्या उंच पाने खाता येतात. जे त्यांना जंगलात टिकून राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जिराफांची मान लांब असते, ज्याची लांबी सुमारे ६ फूट (१.८ मीटर) आणि लांब पाय असू शकतात. त्यांच्या शरीराची अनोखी रचना त्यांना उच्च फांद्या आणि पर्णसंभारापर्यंत पोहोचू देते, जे जिराफाचे प्राथमिक अन्न स्रोत आहे.

उंट 

ज्यात ड्रोमेडरी (एक-कुबड) आणि बॅक्ट्रियन (दोन-कुबड) उंट यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे. सर्वात उंच उंट, विशेषतः ड्रोमेडरी, खांद्यावर सुमारे ५.९ ते ६.६ फूट (१.८ ते २ मीटर) पर्यंत पोहोचू शकतात.

उंट (कॅमलस ड्रोमेडेरियस) हे मोठे, सम-पंजाचे अनगुलेट्स असून त्यांच्या पाठीवर विशिष्ट कुबड (हम्प) असतो. त्य.ंची उंची खालीलप्रमाणे असते:

  • नर: १.८-२.२ मीटर (५.९-७.२ फूट) खांद्यावर
  • मादी : १.७-२.१ मीटर (५.६-६.९ फूट) खांद्यावर
  • उंटांचे वजन ८०० ते २,२०० पौंड (३६० ते १,००० किलो) असू शकते.
आतापर्यंत नोंदलेला सर्वात उंच उंट बाबा नावाचा नर ड्रोमेडरी उंट होता, जो २.३१ मीटर (७.६ फूट) उंच होता. उंट त्यांच्या वाळवंटातील वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतात जसे की जाड फर आणि पाणी वाचवण्याची क्षमता.

तुलना- उंट हे निश्चितच उंच प्राणी असले तरी जिराफ लक्षणीयरीत्या उंच असतात. सरासरी, जिराफ उंटांपेक्षा २-३ पट उंच असतात. येथे उंचीच्या फरकाचा अंदाजे अंदाज आहे:

जिराफ (पुरुष): ५.५ मीटर (१८ फूट) उंट (नर): २.१ मीटर (६.९ फूट)
उंची फरक: अंदाजे ३.४ मीटर (११.२ फूट)

शेवटी, उंचीच्या बाबतीत जिराफ हे स्पष्ट ऊंच आहेत, काही नर ५.९ मीटर (१९.४ फूट) पेक्षा जास्त अविश्वसनीय उंचीवर पोहोचतात. एकट्या जिराफाची मान संपूर्ण उंटाच्या एकूण उंचीपेक्षा लांब असू शकते. उंट, उंच जिराफांशी स्पर्धा करू शकत नाहीत. सर्वात उंच उंटही जिराफाच्या उंचीच्या जवळ येत नाहीत.

Yogesh Ramakant Bholane

I am the Director of Nikant Classes, Dhule. Mob: 9881307618.I am an expert in video editing, VFX, website, and blog development. Additionally, I work as a professional writer and provide writing services to various agencies. Dynamic and creative Marathi content professional with over 15 years of experience in crafting compelling content, including articles, columns, ad copy, and scripts. Adept at creating engaging, versatile, and high-impact content across diverse topics for newspapers, magazines, and digital media platforms. Proven ability to deliver engaging content articles across a wide range of topics, including current affairs, features, lifestyle, agriculture, science, technology, health, finance, and social issues. Skilled in storytelling, scriptwriting, and advertisement copywriting with a knack for captivating audiences. Ready to contribute expertise to dynamic media organizations.

टिप्पणी पोस्ट करा

तुमच्या टिप्पण्या (comments ) आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! कृपया आपले मत आणि प्रश्न येथे मांडा. आम्ही प्रत्येक टिप्पणी वाचतो आणि तुमच्या अभिप्रायाचे स्वागत करतो. आदरयुक्त आणि सकारात्मक सवांद राखण्यासाठी सर्व टिप्पण्या तपासूनच प्रकाशित होतात.

थोडे नवीन जरा जुने